'साहेब आपल्या निर्णयाने आम्ही पोरके झालो...' पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:45 PM2023-05-03T13:45:37+5:302023-05-03T13:45:52+5:30

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

sharad pawar decision is incorrect a letter written in blood by a NCP worker in Pune | 'साहेब आपल्या निर्णयाने आम्ही पोरके झालो...' पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र

'साहेब आपल्या निर्णयाने आम्ही पोरके झालो...' पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र

googlenewsNext

पुणे : साहेब, प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वतःच्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. साहेब, आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झालो आहोत. आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. पवार यांना साकडे घालण्यासाठी पुण्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. शरद पवार निर्णय बदलत नाहीत तोपर्यंत राजीनाम्यावर ठाम आहोत अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जमा झाले. मुंबईतील घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांचे टीव्हीकडे लक्ष होते. पवार साहेबांनी निर्णय बदलला नाही आणि कार्यकर्त्यांना अक्षरशः हुंदका फुटला. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. यावेळी रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, रूपाली पाटील, मुणालिनी वाणी, नीलेश निकम, काका चव्हाण, शिल्पा भोसले, अजिंक्य पालकर, विक्रम जाधव, फईम शेख, गुरुमितसिंग गिल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: sharad pawar decision is incorrect a letter written in blood by a NCP worker in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.