शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

पंतप्रधानपदासाठी शरद पवार पात्रच : डॉ. प्र. चिं. शेजवलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:57 PM

१९५८ ते १९६२ या काळात शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो...

ठळक मुद्दे‘मसाप गप्पा’मध्ये उलगडला जीवनप्रवास

पुणे : ‘मला अनेक दिग्गज नेते आणि समाजसुधारकांचा सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरीसाठी घेतलेली मुलाखत, साने गुरूजी यांचे प्रेम एस. एम. जोशी यांचा स्वीय सहायक असताना लाभलेला सहवास अशा अनेक गोष्टी आजही आठवतात. १९५८ ते १९६२ या काळात शरद पवार यांना मी बीएमसीसी महाविद्यालयात शिकवायला होतो. त्या काळीच ही व्यक्ती पुढे जाऊन देशाचा नेता होईल, असे त्यांच्याकडे असलेल्या गुणांवरून हेरले. त्यांच्याकडे असलेल्या गुणांमुळे ते पंतप्रधान पदासाठी लायकच आहेत’, अशी टिपण्णी ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्रा. प्र. चिं. शेजवलकर यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात शेजवलकर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. व्यवस्थापन क्षेत्र, मराठी मुलांची मानसिकता, दिग्गजांचा सहवास आणि प्रपंच सांभाळत केलेली प्राध्यापकी या सर्वच पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. संजय गोखले यांनी शेजवलकर यांच्याशी संवाद साधला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.शेजवलकर म्हणाले, ‘मराठी मुले अजूनही नोक-यांच्या मागे का पळतात, हा प्रश्न आहे. इतर समाजातील मुलांना उच्चशिक्षण घेऊनही नोक-यांत रस नसतो. मराठी माणसांनी ही मानसिकता आता बदलायला हवी. उद्योजक समाजाची प्रगती घडवत असतात. त्यात मराठी मुलांचा वाटाही असला पाहिजे. त्यांनी स्वत:चा उद्योग स्थापन करून तो वाढवावा. मला पुढील प्रत्येक जन्मी शिक्षक व्हायचे आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत. आज अनेक क्षेत्रांत त्यांनी केलेली प्रगती पाहतो, तेव्हा गहिवरून येते. कामाचे समाधान वाटते.’‘पुरोगामी असल्याने आंतरजातीय विवाहाला माझी कधीच ‘ना’ नव्हती; पण ते जसे वडिलांना कळले, तसे त्यांनी धसकाच घेतला. मुलीचे वडील जसे  मुलींसाठी वर शोधतात, तसे माझे वडील माझ्यासाठी वधू शोधत फिरत होते. लग्नाआधी पत्नीला पहायला गेलो, तेव्हा चहा देऊन ती मागे वळली. मला तिचे केस आवडले आणि मग केसांनीच माझा गळा कापला’, असे सांगताच शेजवलकर यांच्या पत्नी उषा शेजवलकर यांच्यासह संपूर्ण सभागृह खळखळून हसले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधान