‘त्या’ यादीतील राजू शेट्टींच्या नावाबाबत शरद पवार यांनी सोडले मौन; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:45 PM2021-09-04T18:45:36+5:302021-09-04T18:50:42+5:30
एकूणच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन सोडले असून, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे: गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. एकूणच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन सोडले असून, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (sharad pawar give reaction over raju shetti name in the list of 12 mla to be appointed by governor)
“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा जोरात सुरु असून, त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांना राजू शेट्टींच्या नावाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
“इंपिरिकल डेटा केंद्रानेच दिला पाहिजे, तर प्रश्न मिटेल”; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितले
राज्यपाल घेणार अंतिम निर्णय
ते नाराज असतील, तर त्याबाबत काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी यादी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने दिली आहे, त्यात राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशा प्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले त्यावर भाष्य करायचे नाही. दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप
तर करेक्ट कार्यक्रम करेन
आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की, नाही पाळायचा की, पाठीत खंजीर खुपसायचा, कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचे आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला.
“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार
दरम्यान, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारविरोधात केलेली आंदोलने राजू शेट्टी यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राजू शेट्टींच्या जागी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते. हेमंत टकले शरद पवारांचे अतिशय विश्वासू आहेत. पवारांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. दुसरीकडे, निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच म्हटले होते.