पुणे : सगळ्याच नोकऱ्या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचे काय? राज्यात कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पुण्यात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शरद पवारांना अंधारात ठेऊन पहाटेचा शपथविधी झाला होता. पवारांना त्या शपथविधीची माहिती नव्हती. त्याचबरोबर २ जुलैला झालेल्या शपथविधीची कल्पनाही शरद पवारांना नव्हती.
पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागावी. राष्ट्रवादी करप्ट पार्टी आहे तर मग भाजपने सत्तेत कसं घेतलं? भाजपने राष्ट्रवादी पक्ष फोडला. भाजपने आमच्यावर सातत्याने खोटे आरोप केले. भाजपचा दुतोंडीपणा उघड होत आहे.
शरद पवाारांनी राजीनामा का दिला?
शरद पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता. पण पक्षातील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा हट्ट धरल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला होता. भाजपसोबत येण्यास शरद पवारांनी नकार दिला होता. छगन भुजबळांच्या विचारधारेत मोठा विरोधाभास आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.