VIDEO: "शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन, आमचा मात्र अभिमन्यू झालाय", जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:41 PM2023-07-04T13:41:36+5:302023-07-04T13:42:38+5:30

४ ते ५ तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल...

"Sharad Pawar is Shrikrishna and Ajitdada is Arjuna, but we are proud", the reaction of the district president | VIDEO: "शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन, आमचा मात्र अभिमन्यू झालाय", जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया

VIDEO: "शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन, आमचा मात्र अभिमन्यू झालाय", जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया

googlenewsNext

पुणे : सोमवारी (३ जुलै) रात्री आजच्या बैठकीचे उशिरा निरोप गेले त्यामुळे या बैठकीला काही जण हजर नाहीत. जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. ४ ते ५ तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. जिल्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्षांशी चर्चा पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत. आमच्यासाठी शरद पवार हे श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. आमचा मात्र अभिमन्यू झाला असल्याचे गारटकर म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही शरद पवार यांच्या गटातील का अजित पवारांच्या गटाचे या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. काही आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवू. उद्या पुणे जिल्ह्यातील काही जण अजित दादा यांच्या बैठकीला जातील तर काही लोकं शरद पवार यांच्या बैठकीला जातील, असंही गारटकर म्हणाले.

Web Title: "Sharad Pawar is Shrikrishna and Ajitdada is Arjuna, but we are proud", the reaction of the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.