उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:35 PM2023-07-10T12:35:12+5:302023-07-10T12:35:42+5:30

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा

Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear | उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

googlenewsNext

दुर्गेश मोरे

पुणे: राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीनंतर अखेर 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला १३ जुलैचा मुहूर्त सापडला आहे , विशेष म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या पासून पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहेत , त्यांच्या बरोबर मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हि असणार आहेत. शरद पवारांच्या या बालेकिल्ल्यात पावर गेम खेळण्यासाठी थेट जिल्ह्यातील १३८५ सरपंचाना कार्यक्रमाचे निमंत्रण धाडण्यात आल्याचे समजते . काहीनां निमंत्रण हि मिळाले आहे , त्यामुळे जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे शरद पवार कि अजित पवार हे स्पष्ट होणार आहे .

शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे आपल्या ४० आमदारांसह सामील झाल्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलून गेली , शासन आपल्या दारी हा महत्वपूर्ण कार्यक्रम या राजकीय उलथापालथी मुळे दोन – तीन वेळा पुढे ढकलण्यात आला , विशेष म्हणजे हा कार्यक्रम बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर विधानसभेतील जेजुरी येथे घेण्यात येत आहे . माजी मंत्री विजय शिवतरे तसेच भाजपने या कार्यक्रमाला विशेष महत्व दिले होते , अखेर या कार्यक्रमाला १३ जुलैचा मुहूर्त सापडला आहे .

या कार्यक्रमा संदर्भात काही महत्त्वच्या अधिकाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली त्यामध्ये कार्यक्रमाच्या नियोजनसंदर्भात चर्चा झाली. 13 तालुक्यातील तहसीलदारणा प्रत्येकी 10 हजार लाभार्थी जमवण्याचे लक्ष्य दिले होते. त्याचाही आढावा घेणायत आला महसूल लतर्फे लाभार्थ्यकच्या वाहतुकीसाठी  600 बसेस सोय करण्यात आली असल्याचे समजते.

 शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे जिल्हा म्हणजे बालेकिल्ल्यात येत आहेत. अपवाद वगळता सर्व आमदार आणि महत्त्वच्या पदाधिकारी अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. तर कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. तर कोणाकडे जायचे असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे. शासन आपल्या दारीं हा प्रशासकीय कार्यक्रम असला तरी नव्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार सह भाजप नेते जिल्हायत येणार आहेत त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शन होणार हे नक्की.

जिल्ह्यात वर्चस्व शरद पवार की अजित पवार यांचे हे दाखवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 1385 ग्रामपंचायती पैकी बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाला गर्दी होण्यासाठी थेट सरपंचाना कार्यक्रमचे निमंत्रणा देण्यात आले आहे . पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असल्याचे समजते.

आधी वळसे पाटील आता थेट अजित पवार

 मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुण्यात सहकार परिषद व प्रतिमा चिन्ह अनावरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते , त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  दिलीप वळसे पाटील हे येणार होते. मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर वळसे पाटील यांनी रविवारी मंचर येथे सभा घेत शक्ती प्रदर्शन केले. तो पर्यंतच आता अजित पवार आणि भाजपने बारामती लोकसभा मतदार संघात शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. याची संपूर्ण जबाबदारी अतिजवळच्या लोकांवर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या गर्दीवरूनच जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व आहे हे समजणार आहे.

Web Title: Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.