पुणे :शरद पवार फार हुशार व्यक्ती असून ते जनतेची चांगली सेवा करू शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि आराम करावा, असा सल्ला शरद पवारांचे जीवलग मित्र आणि जगातील सर्वाधिक माेठ्या लस तयार करणा-या सिरम इन्सिट्युटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी पवारांना पुण्यात दिला. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे. त्यातच हे महत्वाचे विधान केले आहे. सायरस हे राेखठाेक बाेलण्याबाबत परिचित आहेत. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांबाबत पुनावाला यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, पवार यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी होती, मात्र त्यांनी ती घालवली. आता त्यांनी निवृत्त व्हावे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे पूनावाला यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हे आता लवकरच समाेर येईल. सेवानिवृत्तीच्या विधानाची चर्चा सर्व ठिकाणी रंगली हाेती.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य करत त्यांनी थांबायला हवे असे म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं होते. त्यानंतर शरद पवार यांनी उगाच वया-बियाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला होता. मात्र आता त्यांच्या मित्रानेच थेट निवृत्तीचा सल्ला दिल्याने त्यावर शरद पवार काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.