जेजुरी : आदर्श सांसद ग्राम जवळार्जुन येथे अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत, काही सुरू होत आहेत, तर काही झालेली आहेत; मात्र पावसाअभावी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन येथील क-हा नदी आणि ओढ्यावरील बंधारे व नाले पुरंदर उपसा योजनेतून भरून घेऊ, असे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले.आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी जवळार्जुन हे गाव दत्तक घेतलेले आहे. आज त्यांच्याच हस्ते महिला अस्मिता भवन, कृषी विज्ञान केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि १०० पोलच्या स्ट्रीट लाइट या कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. ग्रामस्थांशी थेट संपर्क साधून त्यांनी आजपर्यंत झालेल्या विविध कामांची माहिती घेतली; तसेच पुढील अग्रक्रमाने राबविण्यात येणाºया कामांची माहिती दिली.या वेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, तहसीलदार सचिन गिरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी पवार,पुरंदरचे सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, दत्ताजी चव्हाण, बबूसाहेब माहुरकर, विराज काकडे, रेखा चव्हाण, सारिका इंगळे, पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती अंजना भोर, गौरीकुंजीर, माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, जेजुरीचे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, जेजुरी पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष शिवाजी पोमण, जवळार्जुनच्या सरपंच सोनाली टेकवडे, उपसरपंच शिवाजी राणे, ग्रामपंचायतीचे सदस्य, तसेच बापू भोर, शिवाजी पवार, सुधाकर टेकवडे, अजिंक्य टेकवडे, रामभाऊ राणे, माऊली राणे, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रा. नंदकुमार सागर यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर वृक्षारोपण, आरोग्य शिबिरही घेण्यात आले.स्वागत सरपंच सोनालीटेकवडे यांनी केले. झालेल्या विकासकामांची माहिती तहसीलदार सचिन गिरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. प्रा. जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले,तर उपसरपंच शिवाजी राणे यांनी आभार मानले.पाण्याची गंभीर समस्यायंदा पर्जन्यमान अल्प राहिल्याने येथे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. येथील ग्रामस्थांची पुरंदर उपसा योजनेतून येथील नदी व ओढ्यावरील बंधारे, नाले भरून घ्यावीत अशी मागणी आहे. आपण या संदर्भात अधिकाºयांकडून माहिती घेतली आहे. त्यांच्याकडून येथील बंधारे व नाले बंधारे भरून घेण्यासाठी सुमारे १०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी योजनेतून उचलावे लागणार आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये योजनेच्या बिलापोटी भरावे लागणार आहेत.ग्रामस्थांनी यातील २५ टक्के रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. उर्वरित रक्कम मी स्वत: उभी करेन आणि येथील सुमारे २१ बंधारे पुरंदर उपसा योजनेतून भरून घेणार आहोत, असे जाहीर केले. यातील ५० दशलक्ष घनफूट पाणी उचलीच्या खर्चाची रक्कम दोन दिवसांत भरून योजनेतून पाणी सोडावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पुरंदर उपसातून जवळार्जुनचे बंधारे भरून घेणार, शरद पवार यांची ग्रामस्थांशी थेट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:11 AM