शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 2:03 PM

शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान मोडून काढत सुळे यांनी तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवला. बारामतीत उमेदवार कोणीही असले तरी मुख्य सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. प्रतिष्ठेच्या या सामन्यात शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना आस्मान दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना चितपट करण्यासाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरू झाल्याचं दिसत आहे. लोकसभेच्या विजयोत्सव साजरा करणं टाळून शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे.

शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यात त्यांचे नातू युगेंद्र पवार हे सावलीसारखे सोबत असल्याचंही दिसत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांचे लाँन्चिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता बारामतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकीकडे पक्षाबाहेर गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या परतीचे दोर कापलेले असताना आता नातू युगेंद्र पवार यांच्यासह बारामतीच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जनसंवाद दौऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

बारामतीतील जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

काही दिवसांपूर्वी बारामतीतील सुपे, शिर्सुफळ या भागाचा दौरा केल्यानंतर आता शरद पवार यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यादरम्यान ते तालुक्यातील उर्वरित भागातील गावांमध्ये जात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यापासून शरद पवार हे बारामतीत फारसे फिरत नसत. मात्र आता अजित पवारांनी वेगळी राजकीय वाट धरल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याने आगामी विधानसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी नातू युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवल्यास अजित पवार यांच्यासाठी ही लढाई आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवार