पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (दि. २७) आढावा घेणार आहे. मार्कट यार्डातील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या बैठका होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातूनच शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत शरद पवार काय मार्गदर्शन करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.