पुणे : सुप्रिया सुळे यांना बारामती आणि इंदापूर वगळता अन्य सर्व मतदारसंघांतून कमी मते मिळत असल्याची माहिती दिल्लीत समजल्यानंतर अस्वस्थ होऊन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खाद्य महामंडळातील मतमोजणी केंद्रातील विश्वासू कार्यकर्त्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधून परिस्थितीची अनेकदा माहिती घेतली. सुळे यांना ५१ हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर या पक्षाच्या गोटात नि:श्वास सोडला गेला. पहिल्या तीन फेर्यांमध्ये सुळे यांना १५ हजार मतांची आघाडी मिळाली. नंतर चौथ्या फेरीत जानकर यांना पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला मतदारसंघांत आघाडी मिळून सुळे यांचे मताधिक्य घसरले. त्यामुळे या पक्षाच्या गोटात चिंंतेचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही अनेकदा विश्वासू कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि माहिती करून घेतली. अजित पवार यांनी ‘निवडून येणार ना?’ असा प्रश्नही या कार्यकर्त्यांना केल्याचे सांगण्यात आले. मतमोजणीच्या ठिकाणी किरण गुजर, सतीश खोमणे, मदन देवकाते, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, अमोल भिसे आदी कार्यकर्त्यांकडे दर फेरीगणिक माहिती मतमोजणी प्रतिनिधी संकलित करीत होते. एका वाहिनीवरून प्रसारित होणार्या वृत्तामध्ये सुळे यांना सहा हजार मतांची पिछाडी असल्याचे वृत्त शरद पवार यांनी पाहिले. त्यानंतर गुजर यांच्याशी थेट संपर्क साधून या वृत्ताविषयी विचारून चिंंता व्यक्त केली व विश्वासार्हता तपासण्याविषयी सांगितले. गुजर यांनी तातडीने निवडणूक निर्णय अधिकार्यांशी चर्चा करून मतमोजणीच्या सहाव्या फेरीपर्यंत सुळे यांना साडेआठ हजार मतांची आघाडी असल्याची माहिती मिळविली आणि पवार यांना तसे कळविले. (प्रतिनिधी)
सुप्रिया सुळे यांच्या घटलेल्या मतांमुळे शरद पवार चिंंताग्रस्त
By admin | Published: May 17, 2014 5:51 AM