पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या महाविकास आघाडीतील कॉग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत सभा होणार आहे. शरद पवार यांना निवडणुकीतील गेमचेंजर मानले जाते. त्यामुळे पवारांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसबा विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. या निवडणुकीत भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस , गिरीश महाजन , रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंदकांत पाटील प्रचारात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडुन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कार्यकतचा मेळावा घेतला आहे. शिवसेना नेते आदित्य ठकारे हे प्रचारासाठी कसब्यात येणार आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट हे आजारी असताना प्रचारात उतरले आहेत. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत सभा होणार आहे.
रवी संधीचा फायदा घे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी रवी आशी संधी कधी येत नाही . या संधीचा फायदा घे .माझ्या तुला शुभेच्छा असे पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, उघोजक विठठल मणियार आदी उपस्थित होते.