विविध विकासकामांचे ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी भरणे म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन विकासकामांची आपण उद्घाटने करत आहोत. असे असले तरी देखील नवीन अद्यावत ऑनलाईन पद्धत चांगली आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार भविष्यात ऑनलाईन बोलतील. राज्यमंत्री भरणे यांचा हा शब्द बाहेर पडताच, चक्क शरद पवार ऑनलाइन कॅमेरासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेजारी सहभागी झाले व तालुक्यातील उपस्थित नागरिकांना नमस्कार करत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची इच्छा पूर्ती तत्काळ पूर्ण झाली.
शरद पवार यांचे ऑनलाइन इंदापूर तालुक्यातील नागरिकांना दर्शन होताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह नागरिकांनी टाळ्या वाजवत शरद पवार यांचे स्वागत केले.
इंदापूर तालुक्यात विकासकामांचा धडाका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लावला आहे, याच विकासकामांचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती लाभल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न आगामी काळात तत्काळ सुटले जातील अशी आशा नागरिकांना लागली आहे.
विरोधकांच्या प्रत्येक टिकेला विकासकामातून उत्तर
इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पोहचत असून, विरोधकांना राज्यमंत्री यांच्यावर टीकेशिवाय कोणतेही काम सध्या राहिलेले नाही, मात्र इंदापूर तालुक्यात हजारो कोटींचा विकास निधी आणून जनसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस धडपड करणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे विरोधकांना विकासकामातून उत्तर देत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले.
२७ इंदापूर शरद पवार
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे आयोजित केलेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती.