शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमात गोंधळ ; घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 6:06 PM

पुण्यात सुरु  असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली असली तरी कार्यक्रमस्थळी मात्र घोषणाबाजी सुरु आहे.

पुणे :पुण्यात सुरु  असलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली असली तरी कार्यक्रमस्थळी मात्र घोषणाबाजी सुरु आहे. पोंक्षे यांचा हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी काही संघटनांनी केली होती. त्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रम रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून कार्यक्रम ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. मात्र पोंक्षे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच आगमन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली आहे. गोंधळ करणाऱ्या आंदोलकांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये सध्या स्वातंत्रवीर सावरकर विषयावर  पोंक्षे यांचे व्याख्यान होणार असून त्यापूर्वी वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे . मात्र हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली होती. 

याबाबत बोलताना खरात यांनी लोकमतला  सांगितले की, 'जगाला गौतम बुद्धांच्या अहिंसेची गरज आहे. यामुळे धार्मिक आतंकवादी तयार होतील. हिंसेला समर्थन देणाऱ्या शरद पोंक्षे यांनी अटक करावी व कार्यक्रम रद्द करावा. आयोजकांशी संपर्क साधला तर त्यांनी लोकमतला सांगितले की, 'आजचा कार्येक्रम ठरल्याप्रमाणेच होणार आहे. समाज विघातक आणि वीर सावरकरांचा सतत द्वेष करणाऱ्या लोकांच्या धमक्यांना सावरकर प्रेमी घाबरत नाहीत'. 

आता हा कार्यक्रम सुरु झाला असला तरी बाहेर फलक घेऊन घोषणाबाजी केली जात आहे.  यावेळी विद्यार्थ्यांनी 'महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या गोडसे यांचं समर्थन करणाऱ्या पोंक्षे यांचा निषेध', फर्ग्युसनमधून किती नथुराम तयार करणार' अशा मजकुराचे फलक हातात धरले आहेत. 

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षेfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालयNathuram Godseनथुराम गोडसेMahatma Gandhiमहात्मा गांधी