टाकळी हाजी: शरदवाडी ग्रामपंचायतीचा कारभार एकमताने करून राज्यात आदर्श निर्माण करा, विकासासाठी निधीची काळजी करू नका, असे आव्हान शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.
शरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नुकतेच जांबूत गावचे विभाजन होऊन शरदवाडी ग्रामपंचायत स्थापन झाली असून, कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक होऊ शकली नाही, पण अजून ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ स्थापन होण्याच्या आधीच गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान दिसून आले. या भागातील विकासकामे करण्यासाठी नेहमी कटिबद्ध असून ऐन वेळेला मात्र दुसरीकडेच भरकटू नका, असा मिश्कील टोलाही पोपटराव गावडे यांनी लगावला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, घोडगंगा सहकारी कारखाना संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, माजी सरपंच जयश्री जगताप, काठापूरचे सरपंच बिपिन थिटे, प्रशासक डी. के. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी साबळे, संदीप गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, संपतराव पानमंद, माजी चेअरमन वासुदेव सरोदे, माजी उपसरपंच गणेश सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, माऊली सरोदे, ग्रा. पं. सदस्य हरिभाऊ सरोदे, ग्रा. पं. सदस्य डॉ औटी, चेअरमन जनार्दन सरोदे, अंकुश गांजे, काशिनाथ सरोदे, सुजय मदगे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक महाराज गांजे यांनी केले, तर बिभीषण महाराज गांजे यांनी आभार मानले.
१९ टाकळी हाजी
शरदवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय भूमिपूजन प्रसंगी पोपटराव गावडे, सुनीता गावडे, राजेंद्र गावडे व इतर.
190821\img-20210819-wa0031.jpg
शरदवाडी ग्रामपंचायत कार्यालय भुमिपुजन