शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

ॲपवर ‘शेअर’ ट्रेडिंगचा नफा दिसला; पैसे काढता येईना, ६.५ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Published: March 23, 2024 3:50 PM

या प्रकरणी शुक्रवारी (दि. २२) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे...

पुणे : आयपीओमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. २२) कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत आसिफ हातिम रंगोली (वय- ४७, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२३ ते २२ मार्च २०२४ यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने मोमेंटम स्टोक कम्युनिटी नावाच्या एका व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज आयपीओविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे भासवले जात होते. काही दिवसांनंतर अधिकृत एजंट बोलत असल्याचे सांगून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींना ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी ६ लाख ८९ हजार रुपयांची गुंतवणूक केली.

यानंतर त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर त्यांनी कोंढवा पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील हे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी