लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाबाबत बेताल वक्तव्य करणारा शरजिल उस्मानी अक्कलशून्य व्यक्ती आहे. अशा व्यक्तीची योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी केली.
बुधवारी (दि. १०) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला या वेेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याने समाजात द्वेषभावना भडकवण्याचे काम केले आहे. आपल्या देशामध्ये काही व्यक्ती राजकीय फायद्यासाठी व स्वार्थापोटी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्ती देशाच्या अखंडता व एकतेसाठी धोकादायक आहेत. सदर प्रकरणाचा छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड जाहीर निषेध करत आहे, असे या वेळी पाटील यांनी सांगितले.