शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:03 IST

महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे

पुणे : महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरिता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त ५ हजार महिलांनी बांगडया भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावत बांगडया भरुन मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला. निमित्त होते, प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे ५ हजार महिलांसाठी बांगडया भरणे व मेहंदी काढणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिला जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके, वनिता वागस्कर, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, अभिषेक थिटे, आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते. अगदी पाच-सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर ने उपक्रमाला विशेष सहकार्य केले. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मंगळागौरीचे खेळ, बांगडया, मेहंदी हे पाहून श्रावणात साजरे होणारे सण आणि जुने दिवस यानिमित्ताने पुन्हा एकदा आल्यासारखे वाटत आहे. महिलांना आनंद देण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांकरिता असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत. प्रल्हाद गवळी म्हणाले, सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील, क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपले सण आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. महिलांना मंगळागौरीचे खेळ पाहण्यासोबतच बांगडया भरणे, मेहंदी काढणे आणि टिकलीचे पाकिट देखील देण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाShravan Specialश्रावण स्पेशलsharmila thackerayशर्मिला ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे