Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:04 PM2022-10-18T19:04:03+5:302022-10-18T19:05:58+5:30

काँग्रेसचे लोकसभेतील माजी गटनेते मल्लिकार्जुन खर्गे व खासदार शशी थरूर हे दोघे या उमेदवार...

shashi tharoor and mallikarjun kharge 29 out of 30 votes from Pune district for the post of Congress president | Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल

Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल

Next

- राजू इनामदार

पुणे :काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातून ३० पैकी २९ जणांनी मतदान केले. प्रकृती बरी नसल्याने माजी आमदार अनंतराव थोपटे हे मतदानासाठी गैरहजर राहिले. उर्वरित सर्व मतदारांनी मुंबईत टिळक भवनमध्ये जाऊन मतदान केले. काँग्रेसचे लोकसभेतील माजी गटनेते मल्लिकार्जुन खर्गे व खासदार शशी थरूर हे दोघे या उमेदवार आहेत.

पक्षाच्या घटनेत राष्ट्रीय अध्यक्षपद निवडणुकीसाठी असलेल्या तरतुदीनुसार ब्लॉक अध्यक्ष मतदार असतात. पुण्यात १२ ब्लॉक आहेत. त्यांचे १२ अध्यक्ष या निवडणुकीत मतदार होते. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, रमेश बागवे, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी गटनेते आबा बागूल, मेहबूब नदाफ, चंद्रकांत कदम, दत्तात्रय बहिरट, संजय बालगुडे, ॲड. अभय छाजेड हे १२ जण मतदार होते. त्यांनी मुंबईत टिळक भवनात जाऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मतदान केले.

जिल्ह्यात १८ ब्लॉक आहेत. त्यांचे अध्यक्ष मतदार होते. त्यामध्ये माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, आमदार, संजय जगताप, नंदुकाका जगताप, अशोक मोहोळ, दिलीप ढमाले तसेच तालुक्यांमधील काँग्रेसच्या अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील अनंतराव थोपटे प्रकृती बरी नसल्याने मतदानासाठी जाऊ शकले नाहीत. अन्य सर्व मतदारांनी मतदान केले.

तब्बल २४ वर्षांनंतर निवडणूक

मुंबईत साेमवारी मतदान झालेल्या सर्व मतपेट्या आता दिल्लीत पाठवण्यात येतील. तिथे बुधवारी (दि. १९) दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयात त्या उघडल्या जातील. मतमोजणी होऊन काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केला जाईल. पक्षात तब्बल २४ वर्षांनंतर या पदासाठी अशी निवडणूक होत आहे.

राज्यात ५४७ जणांनी दिले मत

राज्यात या पदासाठी ५६१ मतदार होते. त्यापैकी ५४७ जणांनी मतदान केले. काही मतदार निवडणूक अधिकारी म्हणून परराज्यात गेले आहेत. त्यांचे मतदान त्या-त्या राज्यात होईल. देशभरात पक्षाचे तब्बल ९ हजार मतदार या पदासाठी मतदान करणार होते.

Web Title: shashi tharoor and mallikarjun kharge 29 out of 30 votes from Pune district for the post of Congress president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.