शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तिला मिळाला आधार मायेचा आणि शैक्षणिक मदतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 8:09 PM

१३ वर्षांपूर्वी मुलगी झाली म्हणून महिलेला मारहाण करून त्यातच तिचा मृत्यू झाला. नुकत्याच जन्मलेल्या मुलीलासुद्धा बापाने नाकारले.....

ठळक मुद्देआजी करतेय सांभाळ : आठवीतील मुलीचे घेतले पालकत्व 

सहकारनगर : दिवसेंदिवस माणुसकी संपत चालल्याचे अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहे. परंतु, असं म्हटले जाते की समाजात वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव वाढतो तसे चांगल्या गोष्टी देखील तेवढ्याच ताकदीने निर्माण होत असतात. तसेच काहीसे उदाहरण सहकारनगर येथे समोर आले आहे.१३ वर्षांपूर्वी मुलगी झाली म्हणून महिलेला मारहाण करून त्यातच तिचा मृत्यू झाला. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला बापाने सुद्धा नाकारले. परंतु, चोच देतो तो अन्नाचीही सोय करतो त्याच म्हणीप्रमाणे तिच्या आजींने (आईच्या आईने) आपल्या वारलेल्या मुलीची जबाबदारी स्वीकारली आणि मिळेल ते काम करून त्या मुलीला मोठे करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. आठवीत शिकणाऱ्या अर्पिता बनकर या मुलीची ही गोष्ट आणि तिची आजी प्रभावती वाघुले यांची....!    आदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल माने यांनी हुशार मुलगी अर्पिताला पालकत्व देऊन तिचे उज्ज्वल भवितव्य घडेपर्यंत कायमचे दत्तक घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी अर्पिता भरतनाट्यम नृत्यकला, जिम्नॅस्टिक खेळ , अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासाठी धडपडत आहे.नगरसेविका साईदिशा राहुल माने यांनी तिच्यासह आज तिचे पालक बनून तिची शाळेची फी ड्रेस बूट मोजे बॅग चप्पल जोड व जीवनावश्यक अनेक वस्तूंची खरेदी करून दिली. आदर प्रतिष्ठाण तर्फे आजपर्यंत अनाथ, वंचित व विशेष अश्या ९७ मुलांना आजपर्यंत शैक्षणिक जबाबदारी घेऊन संभाळ केला आहे. वसाहत पातळीवर मुलींना १३ ते १५ वर्षानंतर रोजगार मिळवण्यासाठी न कळत कामाला लावण्याचे प्रमाण आजही शहरात मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. गेल्या १५ वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत गरीब, गरजू व अनाथ ५०० मुलांना दिवाळीत त्यांच्या आवडते शैक्षणिक साहित्य, कपडे व मिठाई भेट म्हणून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.  

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरStudentविद्यार्थी