शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

आधी विवाहित असतानाही तिने पुन्हा केले लग्न; तरुणाने साखरपुड्याच्या दिवशीच संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 2:13 PM

तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. आता ती त्याला तक्रार करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती..

ठळक मुद्देकोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केला कथित पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : तरुण आणि एक तरुणी यांच्यात ५ वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांनी परस्पर रजिस्टर लग्न देखील केले. परंतु त्यांनी ही बाब घरच्यांना सांगितली नाही. त्याचा फायदा घेऊन तिने या तरुणाचा मानसिक छळ सुरु केला. आधी लग्न झालेले असताना देखील तिने त्याला आपल्या जाळयात ओढलॆ  त्रासाला कंटाळून २८ वर्षाच्या तरुणाने साखरपुडा ठरलेला असताना आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत झाल्याप्रकरणी तरुणाच्या कथित पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी या तरुणाच्या काकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये २८ जून २०२० रोजी सायंकाळी घडली होती.याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी माहिती दिली. हा तरुण आणि एक तरुणी यांच्यात ५ वर्षापूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांनी गुपचूप रजिस्टर लग्न केले होते. मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना न सांगता ते दोघेही आपापल्या घरी राहत होते. अधून मधून ते बाहेर भेटत होते. बाहेर भेटत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले. तरुणाचे कुटुंब सुखवस्तू आहे. या तरुणीचे अगोदरच लग्न झाले होते. असे असताना तिने या तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. आता ती त्याला तक्रार करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर ते ही या तरुणाला मानसिक त्रास देऊ लागले. 

इकडे तरुणाच्या घरच्यांना याची काहीही माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरविले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणू लागली़. जर पळून आला नाही तर सर्व उघड करण्याची धमकी ती देऊ लागली. त्याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गच्चीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचा तपास करीत असताना या तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी तिचे ५ -६ फोन या तरुणाला आलेले निष्पन्न झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाmarriageलग्नDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी