शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:43 PM

इंधन नव्हे, कॅलरीज बर्न करण्याचा दिला संदेश...

ठळक मुद्दे पुुण्यातील महिलेची रोमांचक कहाणी

नितीन गायकवाड - पुणे : चाळिशीत महिला घरातील कामांमध्ये आणि मुलांच्या संगोपनात वेळ देतात. त्यामुळे स्वत: च्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून जगावे लागते. परंतु, पुण्यातील एका महिलेने चाळिशीत काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलवर करून ‘स्त्रीशक्ती’चा धडाच दिला आहे. त्या महिलेचे नाव प्रीती दोशी-मस्के आहे. इंधन कमी जाळून, शरीरातील कॅलरिज जाळण्यासाठी सायकल चालवा, असा संदेश त्यांनी दिला. त्यांनी नुकतेच काश्मीर ते कन्याकुमारी हे  ३३७३ किमी अंतर हे केवळ १७ दिवस, १७ तास आणि १७ मिनिटे अशा वेळेत ३ डिसेंबर रोजी पार केले.  त्यांच्यासोबत पुण्यातील प्रसन्न कुलकर्णी, डॉ. राकेश जैन यांनी हा प्रवास सायकलवर केला आहे. ‘सेव्ह फ्युएल, बर्न कॅलरिज अ‍ॅण्ड फिट इंडिया’चा नारा घेऊन संपूर्ण भारतातून १५ सायकलपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये यांनीदेखील सहभाग नोंदवला. या प्रवासाबाबत दोशी म्हणाल्या, कित्येक वेळा  सायकल दिवसाला पाच-पाच वेळा पंक्चर झाल्या. कधी उणे ३ ते ३५ डिग्री तापमान, थंडी, ऊन-वारा, पाऊस हे सर्व अंगावर झेलत  मोहीम फत्ते केली. सुरुवातीलाच काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे तब्बल २७ तास आमची टीम अडकून पडली होती. पण आम्ही कुठल्याही संकटांपुढे डगमगलो नाही. दररोज २२० किमी अंतर रोज पूर्ण करण्याचे ध्येय होते. प्रत्येक शहरात त्यांचे चांगले स्वागत व सहकार्य मिळाले. चाळिशीनंतर एक आवड म्हणून त्यांनी रनिंगला सुरुवात केली आहे.  आता त्यांचे ध्येय ‘आयर्नमॅन’ ही जागतिक स्पर्धा पूर्ण करण्याचे आहे.  आपण स्वत: सक्षम झालो की समाजही आपल्याला मदत करतोच. महिलांनी ग्रुप करून एकदिवसीय सायकल मोहिमा राबवाव्यात. पुण्याच्या आसपास खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. तेथे महिलांनी ग्रुप करून एकदिवसीय सहली सायकलवर कराव्यात. जेणेकरून महिलांना सायकल चालवतानाच्या एकमेकींच्या समस्या शेअर करता येतील....... प्रीती दोशी-मस्के यांनी पुणे ते पंढरपूर सायकलवर अन् तेही नऊवारी घालून, पुणे ते गोवा दोन दिवसांत पुणे ते पाचगणी ते पुणे, पुणे ते मुंबई ते पुणे मिलिंद सोमण यांच्याबरोबर एकाच दिवसात अशा अनेक मोहिमा त्यांनी याआधी केल्या आहेत. २ आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी एक तास त्या नवीन सायकलपटूंना मोफत प्रशिक्षण देतात. रोज शक्य नसले, तरी आठवड्यातून किमान एक दिवस तरी आॅफिसला सायकलने जाण्याचा सल्ला त्या सर्वांना देतात.

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंग