शिवणे : तिचं वय अवघं चार वर्षाचं, तरी ती गुरुवारी पहाटे ५.१२ मिनिटांनी ती उठली, तिने भक्तीभावाने नमाज अदा केला आणि सकाळी ६.५१ मिनटांपर्यंत तिने ना अन्न मागितले ना पाणी. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला आणि मग नमाज अदा करून इफ्तार केला. इतक्या छोट्या वयात मायरा अबरार खान हिने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज आठ रोजे (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १४ ते १५ तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. कोंढवा परिसरातील मायराने रोजा ठेवला आणि संपूर्ण १४ तास निर्जली राहिली, त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.
रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. यावर्षी हा पवित्र महिना 23 मार्चपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.