कान्हूर मेसाई : शेताच्या बांधाची वैरण गेल्या महिन्यात संपली असून, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिरूर तालुक्यातील बऱ्याच शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकºयांच्या हातात चार पैसे उपलब्ध होत आहेत. या व्यवसायातून आलेल्या पैशातून घरखर्चाला तसेच शेतीसाठी भांडवल म्हणून उपयोग होत आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकºयाकडे असलेला चारा पूर्णपणे संपल्यामुळे शेतकºयाची चारा शोधण्यासाठी ऊसपट्ट्यात वारी चालू आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना जनावरे कशी सांभाळावीत, असा प्रश्न पडला आहे.
दुभत्या जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याने दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने तालुक्यातील श्वेतक्रांती काळवंडली आहे. या वर्षी तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी व इतर पिकाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयाच्या हाती थोड्याफार प्रमाणात आला तो आजपर्यंत शेतकºयांनी कसाबसा जनावरांना खाऊ घालून जगविण्याचा खटाटोप केला. मात्र आता चारा पूर्णपणे संपला असून, पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनल्याने शेतकरीवर्गापुढे आपली जनावरे कशी जगवायची, असा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.
अनेक शेतकरी हे दुभती जनावरे जगविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. आता फक्त शेतकºयांना जनावराचा चारा म्हणून ऊस उपलब्ध होत आहे. त्यासाठी शेतकºयांना एक गुंठा ऊस विकत घेण्यासाठी पाच हजार रुपये वाहनखर्च दोन हजार रुपये व मजुरी एक हजार रुपये इतका खर्च येत आहे. दुधाला मिळणाºया अल्पशा भावामुळे शेतकºयाची ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करून जनावरे जगवावी लागत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतखैरेनगर, कान्हूर मेसाई गावात सुमारे पाच दूध संकलन केंद्रे असून, या माध्यमातून सुमारे साडेचार हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. शेतकºयांना सरासरी पंचवीस-सव्वीस रुपये दर मिळत आहे.चारा व खाद्याचे भाव पाहता हे दर अतिशय कमी असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून दुधाचे भाव वाढवावेत,अशी मागणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तृप्ती भरणे व माजी सरपंच संतोष भरणे, यांनी केली.