डेहणे : आदिवासी भागातील संयुक्त ग्रामपंचायतीत मंदोशीच्या सरपंचपदी उच्चशिक्षीत शीतल आंबेकर, तर उपसरपंचपदी एकनाथ तळपे यांची बिनविरोध निवड झाली.
मंदोशी, शिरगाव या संयुक्त ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झालेल्या असल्याने उर्वरित दोन जागेवर झालेल्या चुरशीच्या लढतीत शीतल प्रकाश आंबेकर व एकनाथ देवराम तळपे निवडून आले. तर कल्पना लांघी, माधुरी शिर्के, विद्या ठोसर, वनीता मिलखे,नवनाथ ठोसर हे बिनविरोध निवडून आले.
सरपंच पदासाठी कृषी पदवीधर असलेल्या व लोकमतातून निवडून आलेल्या शीतल प्रकाश आंबेकर यांना पसंती देत बिनविरोध निवडून दिले. विशेष म्हणजे, नायफड - वाशेरे गटातील त्या एकमेव पदवीधर आहेत. तर, आदिवासी भागात आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे एकनाथ तळपे उपसरपंचपदी निवडले गेले.
यावेळी ग्रामस्थांनी भंडार उधळत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी राम वाळुंज व ग्रामसेवक निकिता लेंडे यांनी काम पाहिले. माजी सरपंच बबन गोडे, प्रा गणेश हुरसाळे, लक्ष्मण हुरसाळे, पो.पाटील राजू तळपे ,गणपत तळपे, बबन गोडे, मारुती डामसे, देवराम आंबेकर व देवाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
फोटो:- मंदोशी (ता.खेड)ग्रामस्थांनी भंडार उधळत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान केला.