खडकवाडी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच अनिल डोके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने एकूण नऊपैकी सहा जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सरपंचपदासाठी शिवसेनेकडून शीला वाळुंज व राष्ट्रवादीकडून अनिता दत्तात्रय धुमाळ यांचा तर उपसरपंचपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ सुक्रे व राष्ट्रवादीकडून शीतल दत्तात्रय भागवत यांचा अर्ज आल्याने हात वर करुन मतदान झाले. शीला वाळुंज व एकनाथ सुक्रे यांना प्रत्येकी पाच मते तर अनिता धुमाळ व शीतल भागवत यांना प्रत्येकी तीन मते पडली.
नवनिर्वाचित सरपंच शीला वाळुंज यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांच्या हस्ते व उपसरपंच एकनाथ सुक्रे यांचा सत्कार माजी सरपंच अनिल डोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण वाळुंज,नाथा सुक्रे, कमल सुक्रे,विजया डोके, काशिनाथ वाळुंज, सुरेश वाळुंज,अतुल डोके,सचिन डोके, माऊली सुक्रे, रंगनाथ सुक्रे , वसंत भागवत उपस्थित होते.
फोटो आहे :