बारामती :सावळ (ता.बारामती) येथील एका शेतामध्ये मेंढ्या चारत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: तालुका पोलीस ठाण्यात लीलाबाई आप्पा टेंगले (मूळ रा. मुढाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दुचाकी पंक्चर झाल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. दि. १४ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास सावळ येथील गट क्रमांक ३०३ मध्ये ही घटना घडली. फिर्यादी शेतामध्ये मेंढ्या चारत असताना दोघेजण दुचाकीवर आले. त्यांनी आमच्या गाडीचे चाक पंक्चर झाले आहे, येथे पंक्चर काढण्याचे दुकान कुठे आहे, असे म्हणत बोलत बोलत जवळ येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.तसेच गाडीवर बसून ते वंजारवाडीच्या दिशेने पसार झाले.