---
भिगवण : शेठ, तुम्ही नादच केलाय थेट, या सोशल मीडिया वरील स्टेटसने ग्रामीण भागातील तरुणांना भुरळ घातली असून दोन दिवसांत जवळपास हजारो तरुणांच्या सोशल मीडिया स्टेटसवर हीच शॉर्ट गाणी ऐकायला, पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कधी कशाची क्रेझ येइल हे सांगणे कठीण, एखादा चित्रपट आला की त्यातील हीरोची नक्कल करणे असो अथवा तीन-चार टाळकी जमवून चौकात अथवा मुख्य रस्त्याच्या मध्येच तलवारीने केक कापणे, आजकाल रोज हटके आणि मित्रांनी हमखास पाहावे यासाठी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे या प्रकाराची चलती झालेली पाहवयास मिळते. आतापर्यंत सैराटपासून मै हु डॉन, आमच्याशी वाकडं त्याची नदीला लाकडं, वावर आहे म्हणून पावर आहे असे अनेक प्रकारचे स्टेटस पाहवयास मिळत होते. काहींना इशारा देण्यासाठी आणि धमकी देण्यासाठीही याचा वापर केला जात होता. मात्र काही दिवसांपासून पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडून अशा स्टेट्सवाल्यांला प्रसादाचे वाटप केले होते. त्यामुळे एकमेकांना धमक्या देणारे स्टेटस कमी झाले आहे.
---
कोट
समाजातील अनेक तरुण समाजाला संदेश देणारे आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करणारे स्टेटस ठेवत असतात. मात्र काही तरुण भरकटत जातात लोकांच्या भावना दुखावणारे, वाद निर्माण होणारे स्टेटस ठेवतात. सामाजिक सलोख बिघडेल असे स्टेटस वापरले तर अडचण निर्माण होते.
जीवन माने, पोलीस निरीक्षक, भिगवण