शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

मंगलदास बांदल यांना फसवणुकीच्या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:40 PM

मंगलदास बांदल यांनी फिर्यादी यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले....

शिक्रापूर: शिरूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटींचे कर्ज घेतले. व त्याची परतफेड न करत एका नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूरपोलिसांनी बुधवारी ( दि. २६) अटक केली आहे. याबाबत दत्तात्रय मांढरे यांनी फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी फिर्यादी मांढरे यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले.मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदी खत करून बांदल यांनी त्या आधारे शिवाजीराव भोसले बँकेतून आठ लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः वापरले. व पुन्हा सदर मिळकती वर कर्जाकरिता मांढरे यांच्या कुलमुकात्यारपत्र व बोगस पुरवणी दस्त करून शिवाजीराव भोसले बँकेतून सव्वा कोटी रुपये कर्ज घेत तेही स्वतः साठी वापरले .व त्याचे कर्ज हप्ते  अडीच कोटी रुपयापर्यंत गेले आहे. या प्रकरणी फसवणूक झाली म्हणून मांढरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल 

एका सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन बळकावण्यासाठी त्रास देत व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगलदास बांदल आणि बापूसाहेब बांदल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकfraudधोकेबाजी