--
आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन वासुली फाटा (ता. खेड) ते मिंडेवाडी शिव (ता. मावळ) या दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले असून पावसाळ्यानंतर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी उप उपअभियंता राऊतराय यांनी सांगितले.
चाकण आणि तळेगाव एमआयडीसीला जोडणाऱ्या प्रजिमा १७ शिंदे - वासुली ते मिंडेवाडी शिव या सहा किलोमीटर दरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहतूक सतत सुरू असते. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. दोन्ही औद्योगिक वसाहतीला जोडणारा महत्त्वाचा व कमी अंतर असलेला हा रस्ता असल्याने अवजड वाहतूक सतत सुरू असते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अनेकदा लहान-मोठे अपघात घडत होते.
यासाठी या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यासह शिंदे ग्रामस्थांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे रीतसर पत्र देऊन मागणी केली होती. मात्र, सध्या पावसाळा झाल्याने डांबरीकरण शक्य नसल्याने रस्त्यावरील खड्डे चांगल्या दर्जाचे काम करून बुजवण्यात आले आहेत.पावसाळा संपल्यावर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता राऊतराय यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : १९आंबेठाण रस्ता खड्डे
फोटो - वासुली फाटा ते मिंडेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले आहेत.