शिरूर शहरातील जुना पुणे नगर रोड, कापड बाजार ,आडत बाजार, सराफ बाजार, भाजीबाजार, सरदार पेठ, जुने, नवे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्पलेक्स, बाजार समिती येथील आडते व्यापारी यासह भागातील व्यापारी यांची दुकाने पुर्णपणे बंद दिसून आली तर मेडीकल, दवाखाने, पेंट्रोलपंप, गॅससेवा यासह अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू असल्यामुळे या परिसरात तुरळक वर्दळ होती.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणारी वाहतुकीसह तुरळक रिक्षा वाहतुक वगळता शहर व परिसरात शुकशुकाट दिसून आला.
शिरूर शहरातील वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असणाऱ्या शिरुर बस स्थानकात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील येणाऱ्या बसेसची संख्या नेहमीच्या तुलनेत सुमारे ७ ते ८ टक्यावर आली तर शिरुर आगारातून बाहेर जाणाऱ्या बसची संख्या फारच कमी होती. एका भागात जाणाऱ्या सुमारे १५ ते२० प्रवाश्यांच्या उपलब्धते नुसार शनिवार, रविवार या विकेंड लॉक डाऊन दरम्यान शिरुर आगारातून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सोडणार असल्याची माहिती आगार प्रमुख महेंद्र मागाडे यांनी दिली.
शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विकेंड लॉक डाऊन दरम्यान कोरोना प्रार्दुभाव थांबविण्याच्या दृष्टीने
शहरातील वेग वेगळ्या भागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार, नागरीक यांच्या वर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे . या पथकाच्या माध्यमातून आज शहरातील सुमारे दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही दुकाने सिल करण्याबाबत तहसिलदारांना पत्र दिले आहे. अशी दंडात्मक कारवाई टाळण्याच्या दुष्टीने नियमांचे पालन करून नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
पोलिसांच्या वतीने शहरात वेगवेगळ्या भागात व बाजारपेठात पेट्रोलिंग करण्यात येत असून नियम मोडणाऱ्या नागरीकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे . त्यामुळे नागरीकांनी कोरोना प्रार्दुभाव थांबविण्याच्या दृष्टीने विकेंड लॉकडाऊन
नियमांचे पालन करून प्रशासनला सहकार्य करावे.
- प्रविण खानापूरे,
पोलिस निरीक्षक --
फोटो क्रमांक : १० शिरुर लॉकडाऊन यशस्वी
फोटो ओळी : लाॅकडाऊन दरम्यान पोलिसांनी केलेली नाकाबंद