शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:17 AM2019-05-23T11:17:34+5:302019-05-23T11:19:04+5:30
Shirur Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे.
शिरूरः शिवसेनेचे खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आतापर्यंत तीनदा विजय मिळवत शिरूरला हॅट्रिक साधली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. आढळराव पाटील यांनी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा जोर लावला आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देऊनही यश न मिळाल्याने राष्ट्रवादीने यंदा शिवसेनेतून आयात केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना संधी दिली आहे. कोल्हे यांनाही तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, इथे अटीतटीची लढत बघायला मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, शिरूरमध्ये १५ व्या फेरीनंतर १९९२० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना .१,९१, ६७१मतं मिळाली असून शिवाजीराव आढळराव यांच्या पारड्यात १, ७१, ७५१ मतं पडली आहेत.
2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग विजय मिळवित हॅटट्रिक साधली होती. आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख 1 हजार 453 मतांनी विजय मिळविला होता. आढळराव यांना 6, 42, 828 तर देवदत्त निकम यांना 3, 41, 375 मते मिळाली होती. शिवसेनेतून ऐन वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ 36, 431 मते तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना 16, 653 मते मिळाली होती. 11 हजार 971 मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला होता.