शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरुरमध्ये अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:37 PM2019-05-23T14:37:13+5:302019-05-23T14:38:44+5:30
पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवत आढळराव पाटील यांना मागे टाकत विजयाची घोडदौंड सुरू केली होती.
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात गेल्या तीन निवडणुकांत हॅट्रिक मारणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जवळपास ५७ हजार मतांनी पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. आंबेगाव तालुक्यातून त्यांना विक्रमी मताधिक्य मिळाले असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्याज्या आकडेवारीनुसार त्यांना ५ लाख ८ हजार १२७ मते मिळाली आहे. तर आढळराव पाटील यांना ४ लाख ४९ हजार ५१९ एवढी मते मिळाली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलावर सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली. उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती. पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवत आढळराव पाटील यांना मागे टाकत विजयाची घोडदौंड सुरू केली होती. १ नंतर कोल्हे यांनी जवळपास ४० हजारांची आघाडी घेतली होती. यामुळे कोल्हे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. गेल्या तिन निवडणुकांत सलग विजय मिळविणारे आढळराव पाटील यांच्या पराभावामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.