Shirur Lok Sabha Result 2024: "धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही", अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:31 PM2024-06-04T15:31:18+5:302024-06-04T15:32:28+5:30
Shirur Lok Sabha Result 2024शिरूरमध्ये पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असून आता ते जिंकण्याच्या वाटेवर दिसू लागले आहेत
Shirur Lok Sabha Result 2024 : शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. हि लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे एकतर्फीच आघाडी दिसून आली आहे. (Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil)
अजित पवार गटाचे उमेदवार बारामतीत आणि शिरूरमध्ये पिछाडीवर आहेत. त्यामुळे अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे दिसून येत आहे. अशातच कोल्हे यांनी फिल्मी स्टाईल मध्ये शेर टाकला आहे. धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही! हे नक्की असं ते म्हणाले आहेत. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी 9 व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी 44 हजारावर गेली. पहिल्या फेरीत कोल्हे पाच हजारांची झाली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेच राहिले.अमोल कोल्हे यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. त्यांनी आधीच विजयाची खात्री दिली होती. त्यानुसार शिरूरमध्ये दुसऱ्यांदा अमोल कोल्हे निवडून येण्याच्या वाटेवर आहेत. शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभं करणे हे अजित पवारांना अवघड गेल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांची लोकप्रियता पाहता शिरूरमध्ये आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु सध्याच्या आकडेवारीवरून आढळराव आघाडी घेणे अश्क्यक असल्याचे दिसत आहे. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर कोल्हे कि आढळराव विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.