दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:00 AM2024-06-04T09:00:31+5:302024-06-04T09:14:36+5:30
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते...
Shirur Lok Sabha Result 2024 | पुणे : शिरूरमध्येशिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलामध्ये खासदार कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीअखेर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना २३ हजार ४०१ तर आढळराव पाटलांना १७ हजार ३१४ मते मिळाली. सुरुवातीला शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हे यांनी ६ हजार ८७ मतांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या फेरी अखेरही अमोल कोल्हेंनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या फेरीतही कोल्हेंनी आघाडी कायम ठेवली आहे. दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांनी ९ हजार ५५३ मतांनी आघाडी घेतली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर पाच वर्षे जनसंपर्क वाढवत अनेक विकासकामे केली होती. त्याच जोरावर आढळराव-पाटील यांनी निवडणूक लढवली. तर दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांना मतदारसंघात संपर्क कमी असल्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी कोल्हे यांना असे प्रसंग ओढवले. मतदारसंघातील काही गावांमध्ये तर पहिल्यांदाच गावात आल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र, तरीही त्यांनी न डगमगता याला विनम्रतेने उत्तरही दिले. त्यामुळे लोकांचा रोष फार काळ टिकला नाही. डॉ. कोल्हे हे अभिनेते असल्याने घरा-घरात पोहोचले होते. त्याचा फायदाही याही निवडणुकीत त्यांनी उचलला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी अधिक भर दिल्याचे प्रकर्षाने जाणवले. कोल्हे यांनी जी काही विकासकामे केली त्याचे रील्सही तयार केले होते. त्याचा प्रभाव अधिक जाणवत होता.
माजी खासदार आढळराव-पाटील यांनी पद नसतानाही लाखो रुपयांची विकासकामे मतदारसंघात आणली होती. तसेच जनसंपर्काच्या जोरावर आढळराव-पाटील यांनी ही निवडणूक चांगलीच रंगवली. वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि रोजगाराचा प्रश्न आदी मुद्यांवर आढळराव-पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान, आढळराव पाटील यांच्या कारकीर्दीतील कामांवर कोल्हे यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र, त्याला आढळराव पाटील यांनी सडतोड उत्तर दिले. प्रचाराच्या शेवटच्या तीन दिवसांअगोदर दोन्ही उमदेवारांनी वैयक्तिक आरोपही केले. पंरतु, शेवट विकासाच्या मुद्यावर झाला. दोन्ही उमेदवारांनी वारे आपल्याच बाजूने असल्याचे म्हटले असले तरी आज दुपारनंतरच वारे कोणाच्या बाजूने होते हे स्पष्ट होईल.