Shirur Lok Sabha Result 2024 : शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निकालानंतर डॉ.कोल्हे यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न: या विजयाचे श्रेय कोणाला देता?
उत्तर : विजयाचे सर्व श्रेय शिरुर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनता, महाआघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील जीव तोडून काम करणारा जीवाभावाचा कार्यकर्ता यांना आहे. एका मोठ्या नेत्याने जाहीर आव्हान करून विजय कसा होतो? असे आव्हान दिल्यानंतर भल्याभल्यांनी भविष्यवाणी केली होती की, कोल्हे निवडून येतील का? कोल्हे यांच्याकडे यंत्रणा नाही, समोरचे उमेदवार धनशक्तीचे आहेत, सत्ता आहे, तेव्हा मी म्हणत होतो की, पुढचे म्हणतात की, मेरे पास गाडी हैं, बंगला हैं, तुम्हारे पास क्या हैं? तेव्हा माझे उत्तर होतं की, मेरे पास जनता हैं.
प्रश्न : शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाचा एकच आमदार आहे, विधानसभेला काय परिस्थिती राहील?
उत्तर : आजच्या निकालामुळे विरोधी पक्षातील आमदारांचे टेन्शन वाढले आहे. एका पत्रकाराने आजच सांगितले, २०१९ला अशीच परिस्थिती होती. त्यावेळी एकच आमदार आमच्या बाजूने होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत एकचे ५ आमदार झाले होते. आता या निवडणुकीत १ आमदार आमच्यासोबत होता, त्यांचे टेन्शन निश्चितच वाढले असणार किंवा त्या आमदारांना टेन्शन येऊ शकतं. पुन्हा १चे पाच आमदार होतील, असे भाकीतही त्यांनी केले.
प्रश्न : शिरुर लोकसभा मतदार संघातील विकासाचे आपले व्हिजन काय?
उत्तर : पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, देशातील पहिला प्रोजेक्ट असलेला इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प, वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचा प्रकल्प, शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी तर वढू तुळापूर येथे शंभुसृष्टी उभारण्याला प्राधान्य, पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, देशातील पहिला प्रोजेक्ट असलेला इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प, वाघोली ते शिरुरच्या दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचा प्रकल्प, शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी तर वढू तुळापूर येथे शंभुसृष्टी उभारण्याला प्राधान्य, इंद्रायणी नदी प्रदूषण व मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा करण्यासाठी प्रयत्न आहे. मतदारसंघातील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क, इनडोअर स्टेडियम, शिवनेरी गडावर जाण्यासाठी रोपवे आदी प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे.