शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ

By admin | Published: March 05, 2016 12:36 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे

शिरूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे प्रमुख, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे प्रादेशिक संचालक व्ही. बी. निलावाड यांनी येथे व्यक्त केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ‘क’ वर्ग नगर परिषदेपैकी शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ व सुंदर असल्याचे कौतुकही निलावाड यांनी केले.स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शिरूर नगर परिषदेला हागणदारीमुक्त योजनेत फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर पडताळणी करण्यासाठी शासनाचे पथक दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले. दोन दिवसांच्या तपासणीनंतर आज नगर परिषदेत नगरसेवकांसमोर निलावाड बोलत होते. पथकातील सदस्य, परभणीचे उपायुक्त रणजित पाटील यांनीही हागणदारीमुक्तीबाबत चांगली परिस्थिती निर्माण केल्याचे म्हटले. नागरिकांशी संवाद साधला असता त्यांची मानसिकता बदलल्याचे निदर्शनास आले. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी मिळून खंबीर भूमिका घेतल्याचे जाणवले, असे पाटील म्हणाले. नगरसेवक जाकीरखान पठाण व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी हागणदारीमुक्तीबाबत माहिती दिली. पठाण म्हणाले, की ओरिजनल लोकसंख्येपेक्षा शहरात फ्लोटिंग लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. रांजणगाव एमआयडीसीमुळे यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सॅनिटरी, पाणीपुरवठा यांबाबत नगर परिषदेवर ताण पडतो, हागणदारीमुक्तीसाठी काम करणे आव्हानात्मक आहे. तरीही यशस्वीरीत्या या योजनेची वाटचाल सुरू आहे. डॉ. थोरात म्हणाले, की वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जात असून, ४०० हून अधिक शौचालये उभारली आहेत. ज्या पटांगणावर झाडे वाढल्याने आडोसा घेऊन हागणदारी वाढत होती, ती पटांगणे नगर परिषदेने साफ केली. सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती केली. नगराध्यक्षा मनीषा गावडे, समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी प्रवीण शिंगटे, स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती रवींद्र ढोबळे, नगरसेवक संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, अशोक पवार, आबीद शेख, नगरसेविका उज्ज्वला बरमेचा, सुनीता कालेवार, सुवर्णा लटांबळे, सुवर्णा लोळगे, कविता वाटमारे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, तुकाराम खोले, प्रशांत शिंदे, डी. टी. बर्गे उपस्थित होते.