शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

शिरूरला भाजपाचे तळ्यात-मळ्यात!

By admin | Published: November 18, 2016 6:02 AM

नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिरूर शहर विकास आघाडीसोबत राहणार, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जाहीर केले असताना

शिरूर : नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिरूर शहर विकास आघाडीसोबत राहणार, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जाहीर केले असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत शहराध्यक्षाने आज हालचाली सुरू केल्या. मात्र, भाजपा आघाडीसोबतच राहणार असल्याचा निर्णय पक्का असून, पक्षाच्या बैठकीत तशाच पद्धतीची रणनीती ठरली असल्याचे आमदार पाचर्णे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आमदार पाचर्णे यांनी आघाडीसोबत राहण्याबाबत घेतलेली ठाम भूमिका आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सुरू केलेली हालचाल पाहता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार पाचर्णे यांनी पक्षाच्या बैठकीत शहर विकास आघाडीबरोबर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्याचे धारिवाल यांच्या निवासस्थानी जाहीर केले होते. आज मात्र भाजपा कार्यकर्त्यांच्या वेगळ्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून आल्याने शहरात एकच चर्चा रंगली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना भाजपाने पक्षस्तरावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. शहराध्यक्ष केशव लोखंडे म्हणाले की, पालकमंत्री बापट यांनी पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या चिन्हावर नगर परिषद निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. आजही भ्रमणध्वनीवर त्यांनी तशाच प्रकारच्या सूचना केल्या. आमदार पाचर्णे यांनीही फॉर्म भरा, असे सांगितले. यानुसार उद्या एबी फॉर्म मिळणार असून, नगराध्यक्षपद व २१ नगरसेवक पदांच्या जागा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत आमदार पाचर्णे यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षाच्या मागे झालेल्या बैठकीत शहर आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्षही या निर्णयासोबत आहेत. आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची रणनीती ठरवण्यात आली असून, हाच निर्णय पक्का आहे. पक्षाच्या आमदाराचा स्थानिक निवडणुकीतील आघाडीसोबत राहण्याचा निर्णय ठाम आहे, तर दुसरीकडे पक्षाचे शहराध्यक्ष म्हणत आहेत की, पालकमंत्री व आमदार या दोघांनीही पक्षाच्यावतीने सर्व जागांवर अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपा आघाडीसोबत राहतो की स्वबळावर लढतो, हे स्पष्ट होईल.आघाडीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात आमदार समर्थकांनीही मुलाखती दिल्या आहेत. आमदारांनी त्यांची इच्छुकांची यादीही आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांच्याकडे सुपूर्त केली आहे. अशात यातून २१ नावे जाहीर होण्याची शक्यता असताना भाजपाने घेतलेल्या निर्णयाने आज आघाडी कशा पद्धतीने आघाडीची नावे जाहीर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आघाडीच्या वतीने उद्या उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. (वार्ताहर)