शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी आल्याने शहराचा पाणीपुरवठा आज सुरळीत करण्यात आला. पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टंचाईच्या काळात नागरिकांची, तसेच विविध पक्ष व नेत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगर परिषद या सर्वांची आभारी असल्याचेही लोळगे म्हणाल्या.बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने आठवडाभरापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. बंधारा कोरडा पडला होता. मात्र, वरील बंधारे पाण्याने भरले होते. या बंधाऱ्याचे ढापे काढून पाणी खाली आणण्यासाठी गेली अठवडाभर नगर परिषदेने प्रयत्न केले. अखेर पाणी काल रात्री बंधाऱ्यात पोहोचले. दरम्यानच्या काळात आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे लोळगे यांनी सांगितले. माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, घोडगंगा सहकारी, तसेच व्यंकटेश साखर कारखान्यातर्फे शहरात दहा पाण्याचे टँकर पुरवल्याबद्दल लोळगे यांनी त्यांचेही आभार मानले. पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, भाजपाचे शहरप्रमुख केशव लोखंडे, समता परिषदेचे किरण बनकर, तसेच शरद परदेशी यांचेही पत्रकार परिषदेत आभार मानण्यात आले. सभापती जाकीरखान पठाण म्हणाले, गेली ८ दिवस पाणीपुरवठा विभागाने बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छता आरोग्य समिती सभापती रवींद्र ढोबळे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख भगवान दळवी, आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे, पाणीपुरवठा विभागाचे लिंबाजी कोकरे, संजय कुंभार, अप्पा पोटघन यांनी यासाठी परिश्रम घेतले. मुख्याध्याधिकारी डॉ. विजय थोरात, अशोक पवार उपस्थित होेते.
शिरूरचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत
By admin | Published: April 19, 2016 1:07 AM