शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

शिरूरला आगामी दोन महिन्यांत पासपोर्ट सेवा केंद्र, परराष्ट्र मंत्रालयाकडून हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:50 AM

पुणे जिल्ह्याची व्याप्ती तसेच परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून, पर्यटकांच्या सोयीसाठी शिरूर येथे आगामी दीड ते दोन महिन्यांत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिरूर : पुणे जिल्ह्याची व्याप्ती तसेच परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून, पर्यटकांच्या सोयीसाठी शिरूर येथे आगामी दीड ते दोन महिन्यांत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडे वर्षभरापूर्वी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.आढळराव-पाटील म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण वाढतानाचे चित्र असून, त्यातून विकसित होत असलेल्या आर्थिक स्थितीमुळे तसेच एकूणच मध्यमवर्गीयांचा परदेशात पर्यटनाला जाण्याकडे कल वाढला आहे. शिरूरसह खेड, आंबेगाव तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांतून दररोज साधारणत: तीन हजार पासपोर्ट वितरित होतात. एवढ्या मोठया प्रमाणावर वितरित होणाºया पासपोर्टची संख्या पाहता, मतदारसंघासाठी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी एक जानेवारीला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. यासाठी पाठपुरावा केला. या संदर्भात परवा झालेल्या बैठकीत सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही गोड बातमी दिल्याचे आढळराव यांनी सांंगितले. दीड महिन्यात येथील पोस्ट कार्यालयातच स्वतंत्र कक्ष निर्माण करून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.शिरूरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाºया चौफुला, म्हावरे तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, चाकण ते तळेगाव ढमढेरे या रस्त्यासंदर्भात तळेगाव दाभाडे ,चाकण, शिक्रापूर या पहिल्या टप्प्याचा डीपीआर पूर्ण झाला असून तो नॅशनल हायवे आॅथॉरिटीकडे पाठविण्यात आला आहे. दुसºया टप्प्यात शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, न्हावरे ते चौफुला रस्त्याचे भूमिसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्रापूरला काही ठिकाणी भूसंपादनाला होत असलेल्या विरोधाची समस्या नॅशनल हायवे व स्थानिकांनी मिळून सोडविल्यास निधीची अडचणच नसल्याचे आढळराव म्हणाले. नाशिकफाटा ते चाकण, खेड सहापदरीसाठी मंजुरी मिळाली असून, एप्रिलमध्ये ते काम सुरू होईल. भूसंपादन व बांधकाम मिळून हा दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याचे आढळराव यांनी सांगितले.शिरूर ते पुणे या रस्त्याला एनएच-७५३ एफ असा नंबर पडला असून, अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे डीपीआरचे काम देण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या रस्त्याचे डीपीआरचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगून आढळराव म्हणाले, की केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरीसाठी तयारी दर्शविली आहे. केवळ भूसंपादनाचा अडथळा असून या अडथळ्याच्या शर्यतीतून बाहेर पडल्यावर काम करण्यास निधीची काहीच अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले.माझ्यामुळे एसईझेड, विमानतळ, रेल्वे प्रकल्प गेल्याचा आरोप होतो. मी इतका पॉवरफुल आहे, तर हे प्रकल्प इथे राहण्यासाठी तुमची काहीच ताकद नव्हती का? असे आढळराव अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांना उदेशून म्हणाले. विमानतळ यांच्यामुळे गेल्याचा टोलाही लगावला.तीन निवडणुकांत मला पराभूत करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणाºया राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार द्यावा, असे आव्हान आढळराव यांनी दिले.५४५ खासदारांमध्ये ‘सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार’ म्हणून माझा नंबर आला असून, सर्वाधिक अकराशेच्या वर प्रश्न आपण विचारल्याचे आढळराव यांनी सांगितले.

टॅग्स :passportपासपोर्टPuneपुणेShirurशिरुर