शिरूर : ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा युतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना वाईट दिवस आल्याचा आरोप करून शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलन करून शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांना एक रुपयाप्रमाणे देय केलेले अनुदान नको, त्यांना योग्य भाव द्या; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी या वेळी दिला.कांद्याला सध्या मिळत असलेला मातीमोल भाव, दुधाचे घसरलेले दर तसेच चासकमान कालव्याच्या आवर्तनाचे अयोग्य नियोजन आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी आज आक्रमक झाली दिसून आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, माजी जि.प. सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, जि.प. सदस्या मनीषा कोरेकर, संगीता शेवाळे, दत्ता हरगुडे, जगन्नाथ पाचर्णे आदींनी सरकारचा निषेध करीत सरकारच्या धोरणांवर हल्ला चढविला.पं.स. सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नरके, युवक तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, माजी अध्यक्ष संतोष रणदिवे, घोडगंगाचे संचालक बाबासाहेब कराटे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, अॅड. रंगनाथ थोरात, अनिल भुजबळ, स्नेहलता यादव, शिक्षण मंडळ सभापती तुकाराम खोले, संतोष शितोळे उपस्थित होते.
शिरूरला ‘राष्ट्रवादी’चे कांदाफेक आंदोलन
By admin | Published: September 23, 2016 2:06 AM