प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीमुळे शिवप्रेमी नाराज; छत्रपती संभाजीनगरच्या प्रकारानंतर अजितदादांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 03:25 PM2023-06-18T15:25:50+5:302023-06-18T15:26:36+5:30
प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहायला का गेले? हे तेच स्प्ष्टपणे सांगू शकतील
बारामती : वंचीत बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले आहे. बारामती येथे विकास कामांचा आढावा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अजित पवार रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील आहेत. माजी खासदार आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याच्या सद्सद्विवेबुद्धीला स्मरूण काय करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र ते तिथे का गेले हे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगू शकतील. शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही. त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज आहेत.
पावसासाठी विठ्ठलाला साकडे घालणार...
पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईच्या काळात एक दिवसाआड पाणी, हातपंपाची दुरूस्ती, टँकरी व्यवस्था, विहिरी ताब्यात घेणे याबाबत प्रशाकिय अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. संकट आले म्हणून घाबराचे नाही. त्याचा मुकाबला करायचा. आता पालखीचे दर्शन घेताना पांडुरंगाला, तुकोबारायाल, माऊलीला विनंती करणार आहे. काही करून आता पाऊस पडू दे. आमच्या पुढे आलेले संकट दुर होऊ दे. पाऊसासठी विठ्ठलाला साकडे घालणार, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.