मार्गासनी : पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गडावर जाण्याची तयारी सुरू करावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे विभागीय समन्वयक व उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
वेल्हे तालुका शिवसेनेकडून करंजावणे येथील पार्वती मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर बोलत होते. मिर्लेकर म्हणाले की, तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करावी. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्क प्रमुख अँड. राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, प्रकाश भेगडे, कुलदीप कोंडे, संतोष मोहोळ, संगीता पवळे, तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, माजी तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने, दीपक दामगुडे, संतोष रेणुसे, गणेश उफाळे, अंकुश चोरघे, मारुती सरपाले, तानाजी शिंदे, लक्ष्मण कडू, बाळा पिलावरे, प्रकाश भावळेकर, प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्वती मंगल कार्यालय करंजावणे (ता. वेल्हे) येथे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना रवींद्र मिर्लेकर व इतर.