पिंपरी : ठाकरे नाव असले म्हणजे कोणी ठाकरे होत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. सत्ता गेल्याने नैराश्यातून हे वक्तव्य केले असल्याचे सांगून त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे आंदोलन झाले.सुलभा उबाळे या वेळी म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेता अशी टीका करण्यात आली आहे. याचा निषेध आहे. अशी टीका यापुढे केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
नगरसेविका मीनल यादव, चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर संघटिका शशिकला उभे, आशा भालेकर, वैशाली मराठे, युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुले, नंदा दातकर, जनाबाई गोरे, वर्षा भालेराव, कामिनी मिश्रा, भारती चकवे, भाग्यश्री मस्के, चिंचवड विधानसभा प्रमुख शर्वरी जळमलकर, नजमा शेख, स्मिता मोगरे, निर्मला पाटील, कविता बॅनर्जी यांच्यासह अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेना जिल्हाप्रमुख सुरेश लांडगे, सचिन सानप, कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू, अमित शिंदे, नितीन बोंडे, चंद्रकांत जाधव, प्रवीण पाटील, प्रकाश जाधव, विभाग प्रमुख निलेश हाके, किशोर शिंदे व शहर समन्वयक सर्जेराव भोसले आदी या वेळी उपस्थित होते.