वेल्हे शिवसेनेकडून करण्यात आली असल्याची माहिती तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे यांनी केली आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे
आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. मागणीचे निवेदन महाराष्ट्र समन्वयक रवींद्र
मिर्लेकर यांनी स्वीकारले. या निवेदनात असे म्हटले आहे की, राजगड तालुका असे नामांतर करण्यास तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील राजगड हा पहिला तालुका आहे.
राजगड हा स्वतंत्र राष्ट्राचा पहिला तालुका असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे आले आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विश्ववंदनीय
कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे अशी मागणी
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यासाठी स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने
गावोगाव अभियान राबविण्यात आले होते. ग्रामसभेचे ठराव वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी प्रशासकीय बाबींची
पूर्तता करत ठरावासह मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच या निवेदनासोबत १९३९ सालचा फोटोझिंको- पुणे येथे छापलेल्या मौजे पाल खुर्द नकाशात राजगड तालुका असा उल्लेख असलेले दस्ताऐवज आणि
तालुका राजगडचा शिक्का असलेला कागद, छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संदर्भात तालुका राजगड असा उल्लेख असलेला, इतिहास संशोधन मंडळाचा कागद,
तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठराव असे कागदपत्रे देण्यात आली आहेत.
या वेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र
समन्वयक रवींद्र मेर्लेकर, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद हांडे, वेल्हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे, उपतालुका प्रमुख गोपाळ
दसवडकर, युवा सेना जिल्हा समन्वयक दीपक दामगुडे, संतोष रेणुसे, गणेश उफाळे, शिवाजी खुळे,अक्षय वालगुडे,सुनील शेंडकर,कैलास चोरघे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना भवन (मुंबई ) वेल्हे तालुक्याला शिवरायांच्या राजगडाचे नाव द्या अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे रवींद्र मिर्लेकर यांना देताना वेल्हे तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे व इतर.