पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५१ आमदार बाहेर गेले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. त्यांच्याकडून पक्ष संपविण्याचा प्रयत्न होत आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे गेले पाहिजे. हिंदुत्व भूमिका असलेल्या पक्षासोबत आपण गेले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीत पडलेले उमेदवार आणि निवडुन आलेल्या उमेदवारांना ९० लाख ४९ हजार मते मिळाली. ४६ लाख मते निवडून आलेले ही उमेदवारांनी घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकार सोबत राहिल्याने नुकसान होत आहेत. शिवसेना पक्ष आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या सज्जनपणाचा फायदा घेतला जात आहे. असे मत पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवतारे म्हणाले की, आम्ही १०० टक्के हिंदुत्वाच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री यांनी या चक्रव्यूहातून बाहेर पडावे. शिवसेनेला मतदान केलेल्या मतदारांचे नुकसान होत आहे. आम्ही तुमच्यासोबत राहू, परंतु महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. एकनाथ शिंदे यांचे ऐकावे, त्याबाबत आम्ही आज मुख्यमंत्री यांना ठराव केलेले पत्र देणार आहोत.
या सर्व घटनांना संजय राऊत जबाबदार
मुख्यमंत्री समन्वयाच्या भूमिकेत असताना राऊत बंडखोरांना आव्हान देत आहेत. त्यांनी शिवसेना बारामतीच्या वलचाळीला नेऊन बांधली गेली आहे. राजकीय स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुरंदर एअरपोर्ट बाबत सर्व परवानगी घेण्यात आलेल्या होत्या. ४ हजार ५०० कोटी रक्कम ची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट साठी सर्वात महत्वाची जागा आहे. परंतू ते दुसरीकडे नेण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रीय बाजार व पुणे बाजार समितीसाठी ५ कोटी रुपये एकर नुसार ४०० एकर जागा मिळत आहे. ती सुद्धा थेऊर कारखानाकडे नेण्याचा घाट घातला आहे. गुंजवडी धरण करून घेतले, त्याच्या कामासाठी निधी पडून आहे. आमचे पाणी बारामतीला पळविले.