शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

मुंबई कोणाच्या बापाची नाही; आम्ही खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंना छावा संघटनेचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:58 PM

एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थनातील आमदारांच्या पाठीशी छावा संघटना ठामपणे उभी असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी आज मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात हालचालींना वेग आला आहे. 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायल मिळत आहे. राज्यभरात मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात असलेल्या बंडखोर आमदारांच्या विभागात शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थनातील आमदारांच्या पाठीशी छावा संघटना ठामपणे उभी असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेनचे नेते संजय राऊत यांच्यासारखे लोक काहीही बोलतात. आई-बहिणींचा आदर ज्यांना ठेवता येत नाही, त्यांना आम्ही ठोकून काढू. आमचा विरोध शिवसेना, राष्ट्रवादी किंवा कोणत्याही पक्षाला नाही. पण ज्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. त्यांनी उठसूट काहीही विधाने केलेले आम्ही खपवून घेणार नाही, असं नानासाहेब जावळे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड नसून सर्वसामान्यांसाठी राजकीय क्रांती करण्यास एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे हजोरा कार्यकर्ते विमानतळावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे. महाराष्ट्रात राहणरा प्रत्येक मराठा आहे. जनतेचे प्रश्न सोडून बाकीची बडबड करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. केवळ आपला मुलगा, पत्नी, कुटुंब याची काळजी या सरकारने अडीच वर्ष घेतली. बाकी जनतेचे प्रश्न बाजूला राहिले. हे आम्ही बघितले आहे. त्यामुळेच सत्याच्या बाजूने आमची संघटना उभी राहिली आहे. मुंबई कोणाच्या बापाची नाही. त्यामुळे इथे येण्यास कोणी कोणाला अडवू शकत नाही, असा इशारा देखील नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना