लोणी कंद : छत्रपती शिवाजीमहाराजांचा शिवमहाल उभारण्यात आला. आकर्षक रोषणाई केलेल्या रथामधून शिवरायांच्या मिरवणुकीत राजाच्या पालखीसह घोडेस्वार, बैलगाडी, शिवकालीन पोषाख व फेटे घालून शेकडो युवकांचा सहभाग अशा उत्साही वातावरणातील मिरवणुकीने संपूर्ण गाव शिवमय झाले होते. आबालवृद्ध सहभागी झाले होते.लोणी कंद (ता. हवेली) येथील शिवाजीयन्स मंडळाच्या वतीने साजरी होणारी शिवजयंती पंचक्रोशीत आकर्षण ठरत आहे. चार दिवस चाललेल्या कार्यक्रमात ‘गेला उडत’ हे विनोदी नाटक, मुद्रा भद्राज गाथा महाराष्ट्राची हे ऐतिहासिक कार्यक्रम प्रा. पांडुरंग केशव कंद यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सरपंच लीना एकनाथ कंद यांनी शिवज्योतीचे स्वागत करून महाराजांची आरती केली. मिरवणूक मार्गावर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. प्रारंभी नगारे, घोडेस्वार त्यामागे पारंपरिक वेशात, बैलगाडीमध्ये तरुण सहभागी झाले होते. शिवरायाची पालखी त्यापुढे सुमारे १२० तरुणांचे ढोल ताशा पथकाच्या दणदणाटात जोडीला हर हर महादेव, जयभवानी जय शिवाजी’ या जयजयकाराने लोणीकंद आसमंत दुमदुमून गेले होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष नितीन कंद, उपाध्यक्ष अतुल फराटे, सचिन लोखंडे, रवींद्र शिंदे, शिवलिंग झुरुंगे, अमोल कंद, हेमंत कंंद, नीलेश कंद आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
लोणी कंदमध्ये अवतरला शिवकाळ
By admin | Published: February 21, 2017 2:00 AM