जेजुरीच्या गडकोट पायरीमार्गाला शिवकालीन महत्व आहे. शहाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे या पितापुत्रांची भेट गडाच्या मार्गावर सुमारे १२वर्षानंतर झाली होती. त्यावेळी शहाजीराजे तंजावर या ठिकाणी होते तर स्वराज्याचा घास घेण्यासाठी शाहिस्तेखान आपल्या फौजेसह पुण्यात तळ ठोकून होता. त्यामुळेच शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. याच ऐतिहासिक घटनेची साक्ष रहावी म्हणून दहा वर्षांपूर्वी तत्कालीन विश्वस्त मंडळाने पायरीमार्गावर समूहशिल्पाची उभारणी केली होती. देवसंस्थानच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. सालाबादप्रमाणे शुक्रवारी (दि१९)सकाळचे सुमारास समूहशिल्पातील पुतळ्याना अभिषेक घालण्यात येऊन पुष्पहार अर्पण करीत भंडाराची उधळण करीत मानवंदना देण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्वस्त पंकज निकुडे पाटील ,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, लेखापाल महेश नाणेकर, बाळा खोमणे, पर्यवेक्षक गणेश डिखळे, बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवन्त दोडके आदी उपस्थित होते.
जेजुरी गडावर शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:33 AM