सकाळी शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी छावा संघटना या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास काळे, अशोक काळे, घोडेगावच्या सरपंच सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, काळेवाडी/दरेकरवाडीच्या सरपंच मंजूषा बोऱ्हाडे, मनीषा काळे, मंगल जैद, धनश्री पोखरकर, गौतम खरात, विनोद काळे, धनंजय काळे, मुरलीधर काळे, अजित काळे, कपिल काळे, संतोष काळे, नरेंद्र काळे, सोनू गाडे, राजेंद्र काळे, शंकर गाडेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत घोडेगावमध्ये देखील सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. घोडेगावमधील काही शिवप्रेमी युवकांनी या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक युवकांनी सहभाग घेतला.
बी. डी. काळे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने होणारी भव्य मिरवणुक न काढता त्याठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, अॅड. मुकुंद काळे, अॅड. संजय आर्विकर, सुरेश काळे, तुकाराम काळे, प्राचार्य आय. बी. जाधव इत्यादी उपस्थित होते.
- घोडेगाव येथे आयोजित शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यासाठी उपस्थित.